Today शुक्रवार, 6th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यात गारठा वाढला..! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात थंडीच्या लाटेचे इशारे; IMD चे यलो अलर्ट जारी

राज्यात गारठा वाढला..! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात थंडीच्या लाटेचे इशारे; IMD चे यलो अलर्ट जारी

पुणे : महाराष्ट्रात डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीने जोर धरला असून, येत्या काही दिवसांत किमान तापमान ७ ते १० अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यभर गारठा वाढेल, असे IMD चे म्हणणे आहे. विशेषतः पुणे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीच्या लाटेसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना उबदार कपडे, आरोग्य सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भात मात्र थंडीचा जोर किंचित ओसरला आहे.

मुंबई-कोकणातील स्थिती

मुंबई आणि कोकणात १० डिसेंबरला किमान तापमान १५ अंशांपर्यंत खाली येईल, तर पुढील दिवसांत १८-१९ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पहाटे-संध्याकाळी थंडीची चाहूल जाणवेल, पण दिवसभर कोरडे आणि उंचावरी हवामान राहील.

पुणे-पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र होईल. पुण्यात १० डिसेंबरला किमान तापमान ८ अंशांपर्यंत जाईल, तर पुढील दोन दिवसांत ते ७ अंशांवर पोहोचू शकते. सोलापूरसह परिसरातही अशीच स्थिती असून, IMD ने यलो अलर्ट दिला आहे. नागरिकांनी सकाळ-संध्याकाळी बाहेर पडताना काळजी घ्यावी.

जळगाव-सर्वाधिक थंड, ६ अंशांपर्यंत पारा

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत मोठी घसरण अपेक्षित आहे. नाशिकमध्ये किमान ७ अंश, तर जळगावात ६ अंशांपर्यंत तापमान खाली येईल. जळगाव राज्यातील सर्वात थंड ठिकाण ठरण्याची शक्यता आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे शेतकरी आणि नागरिकांना त्रास होण्याची भीती आहे.

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना अलर्ट

मराठवाड्यात सकाळच्या गारठ्यासह दुपारच्या कडक उन्हाचा अनुभव कायम राहील. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांसाठी १० डिसेंबरला यलो अलर्ट जारी आहे. किमान तापमान ९-११ अंशांपर्यंत राहील, पण वाऱ्यांमुळे हुडहुडी भरेल.

विदर्भात थंडी ओसरली

विदर्भात यवतमाळ, गोंदिया आणि नागपूरमध्ये थंडीचा जोर किंचित कमी होईल. नागपूरमध्ये किमान तापमान ९ अंश, तर अमरावतीत ११ अंशांपर्यंत राहील. १० डिसेंबरला थंडीची लाट दिसणार नाही, पण कोरडे हवामान कायम राहील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!