Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Tapovan Tree Cutting: तपोवन वृक्षतोडीवर मोठी कारवाई; राष्ट्रीय हरित लवादाकडून तात्पुरती स्थगिती

Tapovan Tree Cutting: तपोवन वृक्षतोडीवर मोठी कारवाई; राष्ट्रीय हरित लवादाकडून तात्पुरती स्थगिती

Tapovan Tree Cutting: नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीचा वाद आणखी तीव्र झाला असून, अखेर मोठ्या विरोधानंतर राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) या वृक्षतोडीवर अंतरिम स्थगिती जारी केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीच्या प्रस्तावाखाली तब्बल 1800 हून अधिक झाडे तोडण्याची योजना समोर आल्यानंतर नाशिकसह राज्यभरातून निसर्गप्रेमी, कलाकार आणि अनेक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. ही स्थगिती मिळाल्याची माहिती याचिकाकर्ते वकिल श्रीराम पिंगळे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, लवादाने दिलेला आदेश हा अंतिम निर्णय नसून अंतरिम स्वरूपाचा आहे. वृक्षतोडीसाठी आवश्यक असलेली कोणतीही पूर्ण कायदेशीर प्रक्रिया न राबवता वृक्षतोडीस सुरुवात करण्याचा प्रयत्न झाला होता. तो रोखण्यासाठी आम्ही तातडीची स्थगिती मागितली होती.

कायदेशीर प्रक्रिया अपूर्ण

वकिल पिंगळे यांनी स्पष्ट केले की, 1975 च्या वृक्षसंवर्धन कायद्यानुसार ट्री ऑफिसरकडून उचित माहिती असलेली नोटीस देणे आवश्यक आहे. मात्र दिलेल्या नोटीसमध्ये कोणती झाडे, किती संख्या, कोणत्या कारणासाठी तोडली जात आहेत? याची कोणतीही स्पष्ट माहिती नव्हती. ही नोटीसच बेकायदेशीर आहे. हजारो आक्षेप दाखल झाले आहेत. ट्री ऑफिसरने या सर्वांचा विचार करून ‘reasoned order’ द्यावा लागेल. तोपर्यंत कोणतीही तोड होऊ शकत नाही, असे पिंगळे म्हणाले. जर आदेश जबरदस्तीने दिला तर त्यालाही NGT मध्ये आव्हान दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Anna Hazare: कुंभमेळा समाजहिताचा असला तरी झाडे तोडू नका! तपोवन वृक्षतोडीच्या वादात अण्णा हजारेंची उडी

तपोवनातील तब्बल ५४ एकर क्षेत्रात साधुग्राम आणि ३५ एकर क्षेत्रात प्रदर्शनी केंद्र (MICE Hub) उभारणीचा प्रस्ताव होता. यासाठी 1825 झाडे तोडण्याची किंवा पुनर्रोपणाची प्रक्रिया आवश्यक ठरणार होती. विरोध वाढताच मंत्री गिरीश महाजन यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, तपोवनात कोणतेही व्यावसायिक बांधकाम होणार नाही. साधुग्रामासाठी फक्त लहान झाडे तोडली जातील. याशिवाय, याठिकाणी १५ हजार नवीन देशी प्रजातींची झाडे वड, पिंपळ, जांभूळ इत्यादी लावण्याची राज्य सरकारची योजना आहे. यासाठी १५ फूट वाढ असलेली झाडे हैदराबादहून मागवली जात आहेत.

पुढील सुनावणी

दरम्यान, लवादाची पुढील सुनावणी १५ जानेवारीला होणार आहे. तोपर्यंत वृक्षतोड संपूर्णपणे बंद राहणार आहे. तपोवनातील निसर्गरक्षक आणि स्थानिक नागरिकांसाठी हा दिलासादायक निर्णय असून, या प्रकरणाचा अंतिम निकाल पुढील काही दिवसांत ठरणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!