Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Lungi Ngidi: काळजाचा थरकाप! झेल घेताना लुंगी एन्गिडीच्या डोक्याला गंभीर दुखापत; मैदानावरच बोलवावी लागली रुग्णवाहिका

Lungi Ngidi: काळजाचा थरकाप! झेल घेताना लुंगी एन्गिडीच्या डोक्याला गंभीर दुखापत; मैदानावरच बोलवावी लागली रुग्णवाहिका

Lungi Ngidi Injury: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर ‘दिल्ली कॅपिटल्स’ विरुद्ध ‘पंजाब किंग्स’ या सामन्यादरम्यान क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. दिल्लीचा स्टार वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी याला क्षेत्ररक्षण करताना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. परिस्थिती इतकी बिकट होती की, त्याला चालताही येत नसल्याने थेट मैदानावर रुग्णवाहिका पाचारण करून रुग्णालयात हलवावे लागले.

झेल घेण्याचा प्रयत्न बेतला जीवावर
पंजाब किंग्सचा संघ २६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना तिसऱ्या षटकात हा अपघात झाला. अक्षर पटेलच्या चेंडूवर फलंदाज प्रियांश आर्याने हवेत फटका मारला. मिड-ऑफला तैनात असलेला एन्गिडी झेल घेण्यासाठी मागे धावत असताना त्याचा ताबा सुटला आणि तो जोरात डोक्याच्या बाजूने जमिनीवर कोसळला. जमिनीवर आदळताच एन्गिडी वेदनेने विव्हळू लागला आणि हालचाल करणे त्याला अशक्य झाले. हे पाहून मैदानावर काही काळ शांतता पसरली आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंनी काळजीत त्याच्याभोवती गर्दी केली.

दुष्मंथा चमीराची ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ म्हणून एन्ट्री
एन्गिडीच्या डोक्याला झालेल्या जखमेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला तातडीने सामन्यातून बाहेर करण्यात आले. आयसीसीच्या नियमांनुसार, दिल्ली कॅपिटल्सने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा याला ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ म्हणून मैदानात उतरवले आहे. पंजाबचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही तातडीने मैदानावर धाव घेत एन्गिडीच्या प्रकृतीची माहिती घेतली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!