Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुम्हालाही फोनमधील व्हिडिओ स्क्रोल करण्याची सवय आहे? तर काळजी घ्या ! तुमच्या मेंदूवर करतात परिणाम…

तुम्हालाही फोनमधील व्हिडिओ स्क्रोल करण्याची सवय आहे? तर काळजी घ्या ! तुमच्या मेंदूवर करतात परिणाम…

नवी दिल्ली : तुम्ही इंटरनेटवर छोटे व्हिडिओ स्क्रोल करत असाल. स्क्रोल करताना, मनात एकच विचार येत राहतो, फक्त अजून काही व्हिडिओ, दोन-चार व्हिडिओ आणि हे छोटेसे स्क्रोलिंग तासांमध्ये कधी बदलते हे तुमच्या लक्षातही येत नाही. पण, तुम्हाला माहिती आहे का? याने तुमच्या मेंदूवर परिणाम होतो.

अभ्यासातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये त्यांनी लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असलेल्या कामांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचे ईईजी स्कॅन केले. त्यांना असे आढळले की, जे लोक जास्त स्क्रोलिंग असलेले कंटेंट पाहत होते, त्यांची एकाग्रता इतरांपेक्षा कमी होती. शॉर्ट व्हिडिओ ही एक हळूहळू लागणारी सवय आहे, कारण त्यात नवीन आणि आकर्षक कंटेंट खूप लवकर येतो. जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ पाहता, तेव्हा तो एक भावनिक प्रतिसाद निर्माण करतो, ज्यामुळे तुम्हाला आणखी पाहण्याची इच्छा होते.

कालांतराने, तुमच्या मेंदूला लहान आणि वेगवान कंटेंटची सवय होते, ज्यामुळे मोठे व्हिडिओ पाहण्याची आणि समजून घेण्याची इच्छा कमी होते आणि तुम्हाला हळूहळू शॉर्ट व्हिडिओंचे व्यसन लागते. याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या संपूर्ण कार्यावर होतो. सतत लहान, वेगवान कंटेंट पाहिल्यामुळे मेंदूला तात्काळ मिळणाऱ्या फायद्यांची सवय लागते, ज्यामुळे संयम कमी होतो आणि दीर्घकाळ एकाच कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!