Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुवर्णसंधी ! ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ येथे मिळू शकते नोकरी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

सुवर्णसंधी ! ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ येथे मिळू शकते नोकरी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

कर्मचारी चयन आयोग अर्थात ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ येथे स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ आणि स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला भारतभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 731 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.

यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. १५ मे २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://ssc.gov.in/  या  अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ आणि स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’.

–  एकूण रिक्त पदे : 731 पदे.

– वयाची अट : स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’: 18 ते 30 वर्षे, स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’: 18 ते 27 वर्षे.

– शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी पास / समतुल्य.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.

– अर्ज शुल्क : रु. 100/- अर्ज फी म्हणून. SC/ST/PWBD/ExSM: कोणतेही अर्ज शुल्क नाही.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ मे २०२६ (२३:०० वाजता).

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!