Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तेलकट, मसालेदार पदार्थांना आहारातून करा ‘बाय-बाय’; आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर

तेलकट, मसालेदार पदार्थांना आहारातून करा ‘बाय-बाय’; आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर

सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपण आपली जीवनशैली अर्थात लाईफस्टाईल नकळतपणे बदलत आहोत. अयोग्यवेळी खाणं आणि बदलती लाईफस्टाईल यामुळे बीपी, लठ्ठपणा, मधुमेह अशा आजारांना निमंत्रण आपण देत आहोत. खूप पैस खर्च करून महागडी औषधे घेतली जातात. मात्र, त्याचा तुम्हाला फायदा होईलच असे नाही. यासाठी नियमित काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.

सकाळचा सूर्यप्रकाश घेण्याचा सल्ला दिला जातो. सूर्यप्रकाश शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. सूर्यप्रकाश शरीरात मेलाटोनिन हार्मोन तयार करतो ज्याचा फायदा चांगल्या झोपेसाठी होतो. शिवाय थोडा वेळ उन्हात बसल्याने तणाव देखील दूर होतो. यासाठी नियमित शरीराला सूर्यप्रकाश घ्या. जर तुम्हाला कोलेस्टेरॉल, मधुमेह, हृदयाच्या समस्यांसारखे धोकादायक आजार टाळायचे असतील, तर सर्वप्रथम तुमच्या आहारातून तेलकट, मसालेदार आणि जंक फूड पूर्णपणे वगळा.

तसेच साखर आणि मीठाचे प्रमाण कमी करा. साधे अन्न खा, जे केवळ शरीरच नाही तर मन देखील निरोगी ठेवते. याचबरोबर खाण्याची वेळ निश्चित करा. यामुळे तुमचे वजन वाढणार नाही. तुम्ही वर्कआउट करण्यासाठी दररोज २०-३० मिनिटे काढा. याचा फायदा तुम्हाला शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी होतो. तुमचे वय अनेक वर्षे वाढवू शकता.

प्रत्येकवेळी जिममध्येच जाणं नाही गरजेचे 

वर्कआऊट म्हणजे जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळणे असे नाही तर घरातील सामान्य कामे करूनही तुम्ही सहज फिट राहू शकता. त्यामुळे योगासने, दोरीवर उडी मारणे, चालणे यासारखे अनेक छोटे-छोट पर्याय तुम्ही वापरू शकता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!