Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

YouTube मधूनही होते कमाई; 1000 Views साठी कंपनी किती देते पैसे?

YouTube मधूनही होते कमाई; 1000 Views साठी कंपनी किती देते पैसे?

नवी दिल्ली : सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यात YouTube केवळ एक मनोरंजन प्लॅटफॉर्म राहिलेला नाही, तर तो उत्पन्नाचा एक स्रोत बनला आहे. अनेक लोक याला पूर्णवेळ करिअर म्हणून स्वीकारत आहेत. पैशांचं माध्यम बनल्याने त्याकडे कलही जास्त वाढताना दिसत आहे.

YouTube वर १००० व्ह्यूजसाठी कोणतीही निश्चित रक्कम नाही. साधारणपणे, तुम्ही १००० व्ह्यूजमागे २० ते २०० रुपये कमवू शकता. हे पूर्णपणे तुमच्या व्हिडिओवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींवर आणि तुमच्या प्रेक्षकांच्या देशावर अवलंबून असते. यूट्यूबची कमाई अनेक घटकांवर आधारित असते. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सीपीएम (कॉस्ट पर मिले), म्हणजेच १००० व्ह्यूजमागे मिळणारी रक्कम.

जर तुमचे प्रेक्षक भारतातील असतील, तर सीपीएम कमी असतो, तर अमेरिका आणि युकेसारख्या देशांतील व्ह्यूजमधून जास्त महसूल मिळतो. याशिवाय, व्हिडिओचा विषय देखील महत्त्वाचा आहे. टेक, फायनान्स आणि शिक्षण यांसारख्या विषयांवरील जाहिराती अधिक महाग असतात, तर मनोरंजन किंवा व्लॉग्सवरील जाहिरातींमधून कमी महसूल मिळतो.

यूट्यूबवर पैसे कमवायला सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला यूट्यूब पार्टनर प्रोग्राम (YPP) मध्ये सामील होणे आवश्यक आहे. यासाठी किमान १००० सबस्क्रायबर्स, गेल्या १२ महिन्यांत ४००० तासांचा वॉच टाईम किंवा ९० दिवसांत १० दशलक्ष शॉर्ट्स व्ह्यूज. या आवश्यकता पूर्ण केल्यानंतरच तुमच्या व्हिडिओंवर जाहिराती चालतील आणि तुम्ही कमाई करण्यास सुरुवात कराल. यूट्युबवरील पैसे फक्त जाहिरातींपुरते मर्यादित नाहीत. अनेक मोठे क्रिएटर्स या पद्धतींद्वारे लक्षणीय महसूल मिळवतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!