Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. 23 आणि 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत द्रुतगती मार्गावरील वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत कि.मी. 58/500 (डोंगरगाव/कुसगाव) परिसरात पुलाच्या शटरिंग काढणे आणि रंगकामाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
23 एप्रिल रोजी मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 3 दरम्यान बंद राहील. या काळात सर्व वाहने किवळे-देहूरोड-तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळविण्यात येणार आहेत.
तर 24 एप्रिल रोजी पुण्याकडे येणारी वाहतूक याच वेळेत बंद ठेवण्यात येणार असून, कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहूरोड-किवळे मार्गे वाहतूक वळवली जाईल.
या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, या काळात अडचण आल्यास नियंत्रण कक्ष (9822498224) किंवा महामार्ग पोलिसांच्या (9833498334) क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.


