Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Anna Hazare: कुंभमेळा समाजहिताचा असला तरी झाडे तोडू नका! तपोवन वृक्षतोडीच्या वादात अण्णा हजारेंची उडी

Anna Hazare: कुंभमेळा समाजहिताचा असला तरी झाडे तोडू नका! तपोवन वृक्षतोडीच्या वादात अण्णा हजारेंची उडी

Anna Hazare On Tapovan: नाशिकमधील तपोवन परिसरातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून झाडांना कुऱ्हाड चालवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, हजारे यांनी “कुंभमेळा समाज आणि राष्ट्रासाठी महत्वाचा असला, तरी हिरवाईची कत्तल कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही,” असे स्पष्टपणे सांगितले. अनेक दिवसांपासून पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि कलाविश्वातील काही व्यक्ती या ठिकाणी आंदोलन करत असल्याने हा मुद्दा राज्यभर गाजतो आहे. अण्णा हजारे यांनी म्हटले की, झाडे मानवांसोबत वन्यजीवांचेही जीवन वाचवतात. त्यामुळे अत्यावश्यक परिस्थितीत फक्त छोटी झाडे हलवण्याचा विचार करता येईल, मात्र मोठी, जुनी आणि पर्यावरणासाठी महत्त्वाची झाडे तोडणे टाळावे. त्यांच्या वक्तव्यामुळे या वादाला आणखी वेग आला आहे.

हेही वाचा – तपोवनातील वृक्षतोडीबाबत सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका हिताची; अजित पवारांच्या भूमिकेमुळे वाढली महायुतीची डोकेदुखी

हजारे उपोषणाला सज्ज; मुख्यमंत्रीांना पत्र

अण्णा हजारे यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी केली आहे. त्यांनी 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धीतील यादव बाबा मंदिरात उपोषणाला बसण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारकडून लोकायुक्त विधेयक लांबणीवर टाकले जात असल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे.

हेही वाचा – Tapovan tree cutting : तपोवनातील वृक्षतोडीवर नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य; ठाकरे गटाने ‘टिल्लू लेव्हल बुद्धी’ म्हणत चांगलंच झोडपलं

तपोवनातील प्रकल्पावर मोठा वाद

दरम्यान, कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून तपोवनमध्ये उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पावरून मोठा वादंग निर्माण झाले आहे. पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे की या प्रकल्पासाठी 300 पेक्षा जास्त प्रौढ झाडे कापण्यात आली असून, यामुळे परिसरातील जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात येईल. महापालिकेने मात्र आपली बाजू मांडताना 447 झाडांपैकी फक्त मंजूर 300 झाडांची तोड केल्याचे आणि उर्वरित झाडे वाचवल्याचे सांगितले आहे. तरीही नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये असंतोष कायम आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!