Today गुरूवार, 29th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Airport : पुणेकरांसाठी गुड न्यूज! विमानतळावर जाण्यासाठी आता ट्रॅफिकपासून मिळणार सुटका

Pune Airport : पुणेकरांसाठी गुड न्यूज! विमानतळावर जाण्यासाठी आता ट्रॅफिकपासून मिळणार सुटका

पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोहगाव ये-जा करणाऱ्या लाखो प्रवाशांना वाहतूक कोंडीतून लवकरच दिलासा मिळणार आहे. नागपूर चाळ ते थेट विमानतळ प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता आता 12 मीटरवरून दुप्पट म्हणजे 24 मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. या कामासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीचा वापर केला जाणार आहे.

वाहतूक कोंडी
पुणे विमानतळावरून दररोज सुमारे दोनशे ते सव्वादोनशे उड्डाणे होतात आणि वार्षिक प्रवासी संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रवाशांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. प्रवाशांना बाराही महिने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

या विकासामुळे पुणे शहराची ओळख, समृद्ध वारसा आणि संस्कृतीचे पहिले आणि शेवटचे प्रतिबिंब प्रवाशांच्या मनात उमटेल. लवकरच या महत्त्वाकांक्षी रुंदीकरण आणि सुशोभीकरण कामाला सुरुवात होणार आहे. हा रस्ता पुण्याची नवी ओळख बनेल, असे मत मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

भूसंपादनाचा मोठा अडथळा दूर
विमानतळ परिसरातील रस्ता प्रामुख्याने हवाई दलाच्या मालकीचा आणि काही खासगी मालकीचा आहे. हवाई दलाकडून जागा ताब्यात मिळण्यास दीर्घकाळ विलंब होत असल्याने रस्त्याचे रुंदीकरण रखडले होते. मात्र, आता हवाई दलाने नागपूर चाळ ते विमानतळपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाला हिरवी झेंडी दिली आहे. त्याचप्रमाणे खासगी जागा मालकांनीही भूसंपादनासाठी संमती दर्शवली आहे. यामुळे नागपूर चाळ ते लोहगाव विमानतळापर्यंतच्या तीन किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!