Suresh Dhas On Rohit Pawar: विधानसभेत शासकीय विधेयक सादर करण्याची प्रक्रिया सुरू असताना सभागृहात अचानक वातावरण तापले. भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात अनपेक्षित वाद उफाळला. सुरेश धस यांनी भाषणादरम्यान रोहित पवार यांच्या मतदारसंघाचा उल्लेख करत केलेल्या टिप्पणीनंतर हा संघर्ष उफाळून आला.
माझ्यावर राजकीय सूडाचा डाग – सुरेश धस
विधानसभेत बोलताना सुरेश धस म्हणाले की, महाविकास आघाडीच्या कारकीर्दीत त्यांच्यावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अनावश्यक गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे ते सर्वाधिक छळले गेलेले आमदार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांचे म्हणणे होते की, डीवायएसपीच्या चौकशीत त्यांचं नाव समोर आलं नाही, अनिल देशमुख यांच्या काळात स्थापन झालेल्या एसआयटी तपासातही काही निष्पन्न झाले नाही, एसीबी चौकशीसाठी आवश्यक परवानगी देण्यासही त्यावेळच्या मंत्र्यांनी नकार दिला. भाषणादरम्यान सुरेश धस यांनी रोहित पवार यांच्या मतदारसंघात “विशेष डुकराचे मटन” मिळते, अशी उपरोधिक टिप्पणी केली. तसेच त्या भागात मारामाऱ्या झाल्या की दोष आपल्यावर ढकलला जातो, असा आरोपही त्यांनी केला. यावर तात्काळ प्रतिक्रिया देत रोहित पवार यांनी सभागृहात कडक आक्षेप नोंदवला
हेही वाचा – ‘सुरेश धस यांच्याकडून माझ्याही जीवाला धोका…’; असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
माझ्या मतदारसंघाचा अपमान; रोहित पवारांचा संताप
रोहित पवार म्हणाले की, जामखेड ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींची पवित्र भूमि आणि संत श्री सीताराम बाबांची कर्मभूमी आहे. अशा भूमीबद्दल अशा शब्दांत बोलणे योग्य नाही. त्यांनी धस यांना थेट सांगितले की उदाहरण देण्यासाठी मतदारसंघाचे नाव घेण्याची काहीही गरज नव्हती. यानंतर सुरेश धस यांनी आपले शब्द मागे घेत असल्याचे जाहीर केले.
हेही वाचा भाजपकडून बीडमध्ये सुरेश धसांकडे मोठी जबाबदारी; तर पंकजा मुंडेंची ‘या’ पदावर नियुक्ती
माझा हेतू वेगळा होता; धसांचे स्पष्टीकरण
धस यांनी सांगितले की त्यांचा उद्देश मतदारसंघाचा अवमान करण्याचा नव्हता. मात्र, जयंत पाटील नाव न घेता अप्रत्यक्ष आरोप करीत असल्याने ते उत्तर देत होते. महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्या घरात रात्री उशिरा अधिकारी पाठवून त्रास दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.


