पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात (FC कॉलेज) १३ ते २१ डिसेंबर २०२५ दरम्यान भव्य “पुणे पुस्तक महोत्सव २०२५” आयोजित केला आहे. या ९ दिवसांच्या कार्यक्रमाला VVIP, VIP, हजारो विद्यार्थी आणि पुणेकर मोठ्या संख्येने येणार असल्याने FC रोड आणि जंगली महाराज रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी आजपासून (१३ डिसेंबर) ते २१ डिसेंबर पर्यंत FC रोडवर आवश्यकतेनुसार वाहतूक बदल केले आहेत. नागरिकांनी शक्यतो FC रोड टाळावे आणि खालील पर्यायी मार्ग वापरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पर्यायी मार्गाचा वापर करा
१. जंगली महाराज रोडने कर्वे रोड करीता बालगंधर्व डावी कडे वळून, नदीपात्र रोडने, महादेव मंदीर येथून इच्छित स्थळी.
२. कर्वेरोड कडून एफ. सी. कॉलेज रोडने शिवाजीनगर कडे जाण्याकरीता कर्वे रोड नळस्टॉप, लॉ कॉलेज रोडने, सेनापती बापट रोडने इच्छित स्थळी
३. पुस्तक महोत्सव करीता येणारे नागरीकांसाठी एफ.सी. कॉलेज गेट नं. ३ संत तुकाराम महाराज पादुका चौक येथून दुचाकी चारचाकी / बस इत्यादी वाहनांना एफ. सी. कॉलेज मधील पार्किंग ग्राऊंड करीता प्रवेश देण्यात येणार आहे.
४. पुस्तक महोत्सव करीता येणाऱ्या नागरिकांनी बाहेर जाण्याकरीता एफ. सी. कॉलेज गेट नं. ४ चा वापर करावा.
५. पुस्तक महोत्सव करीता येणाऱ्या नागरीकांनी फक्त पायी जाण्यासाठी एफ.सी. कॉलेज गेट नं. २ चा वापर करावा.
पुस्तक महोत्सवाला येणाऱ्यांसाठी पार्किंग व प्रवेश व्यवस्था
वाहनांसाठी प्रवेश: गेट नं. ३ (संत तुकाराम महाराज पादुका चौकाजवळ) → थेट कॉलेजच्या पार्किंगमध्ये जा.
बाहेर पडण्यासाठी: गेट नं. ४ वापरा.
फक्त पायी येणाऱ्यांसाठी: गेट नं. २ वापरा.


