Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Eknath Shinde shiv sena : निवडणुकीआधी ठाकरेंना मोठा धक्का; १६ बड्या नेत्यांनी केला शिंदे गटात प्रवेश

Eknath Shinde shiv sena : निवडणुकीआधी ठाकरेंना मोठा धक्का; १६ बड्या नेत्यांनी केला शिंदे गटात प्रवेश

Eknath Shinde shiv sena : महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग येत असताना, शिवसेना (ठाकरे गट)ला अकोल्यात मोठा धक्का बसला आहे. महापालिकेतील गटनेते व शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली १६ प्रमुख नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. नागपूर येथील शिंदे यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थतिथीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला शहरात मोठे खिंडार पडले असून, शिंदे सेनेला स्थानिक राजकारणात मोठे बळ मिळाले आहे.

अकोला महापालिकेतील ८ पैकी ६ नगरसेवकांनी शिंदे गटाचा मार्ग निवडला आहे. यामुळे महायुतीला अकोला महापालिका निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. राजेश मिश्रा यांचे कुटुंब गेल्या ४० वर्षांपासून अकोला महापालिकेच्या राजकारणात सक्रिय आहे. त्यांचे वडील, आई, स्वतः, पत्नी आणि वहिनी हे नगरसेवक राहिले आहेत. २०२४ च्या निवडणुकीत मिश्रा यांनी अकोला पश्चिम मतदारसंघात अपक्ष म्हणून अडीच हजार मतं मिळवली होती, ज्यामुळे भाजप उमेदवाराचा १,२८३ मतांनी पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर मिश्रा यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे महायुतीतील भाजप नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिंदे यांनी पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना, “बाळासाहेबांच्या विचारांचा आदर करणारे शिवसैनिक आमच्यासोबत येत आहेत. हे प्रवेश महाराष्ट्राच्या विकासासाठी पाऊल आहे,” असे म्हटले. या घटनेमुळे अकोला महापालिका निवडणुकीची रंगीत गोष्ट आणखी रंजक होत आहे. शिंदे सेनेला आता शहरातील ६० टक्के पेक्षा जास्त नगरसेवकांचा आधार मिळाला असून, येत्या महिन्यांत आणखी प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गट मात्र आपल्या उमेदवारांना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

या नेत्यांनी केला जय महाराष्ट्र
१)राजेश कृपाशंकर मिश्रा (शिवसेना शहरप्रमुख तथा गट नेते मनपा अकोला)
२) सौ अनिताताई राजेश मिश्रा (नगरसेविका)
३)गायत्रीदेवी कृपाशंकर मिश्रा (माजी नगरसेविका)
४)गजानन उत्तमराव चव्हाण ( नगरसेवक)
५) सौ प्रमिलाताई पुंडलिकराव गीते ( नगरसेविका)
६) सौ राजकुमारी राजकुमार मिश्रा (माजी नगरसेविका)
७)तरुण जगदीश बगेरे (उपजिल्हा प्रमुख)
८)नितीन रमाशंकर मिश्रा (युवा सेना शहर प्रमुख)
९)संजय रतनलाल अग्रवाल ( उपशहर प्रमुख )
१०) अंकुश जी शिंत्रे ( उपशहर प्रमुख)
११)रुपेश ढोरे (विभाग प्रमुख)
१२)राजेश इंगळे (विभाग प्रमुख)
१३)मुन्ना भाऊ उकर्डे (विभाग प्रमुख)
१४)श्याम भाऊ रेळे (विभाग प्रमुख)
१५)चेतन राजेंद्र मारवाल (सोशल मीडिया समन्वयक)
१६)योगेश पुंडलीकराव गीते (प्रसिद्धी प्रमुख)

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!