Today बुधवार, 12th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे ते छत्रपती संभाजीनगर 6 तासांचा प्रवास आता फक्त 2 तासांत! नितीन गडकरींची मोठी घोषणा

पुणे ते छत्रपती संभाजीनगर 6 तासांचा प्रवास आता फक्त 2 तासांत! नितीन गडकरींची मोठी घोषणा

Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेला नवी दिशा देणारी मोठी घोषणा केली आहे. पुणे आणि संभाजीनगर (औरंगाबाद) या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा अत्याधुनिक एक्स्प्रेस हायवे उभारण्यात येणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १६ हजार ३१८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते संभाजीनगर हे अंतर अवघ्या दोन तासांत पार करता येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. सध्या पुण्याहून संभाजीनगरपर्यंत प्रवासासाठी सहा ते साडेसहा तासांचा वेळ लागतो. नव्या एक्स्प्रेस हायवेमुळे हा प्रवास निम्म्याहूनही कमी होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महामार्गाची रूपरेषा काय असेल?

या प्रकल्पाची माहिती देताना गडकरी यांनी सांगितले की, पुणे-अहिल्यानगर-संभाजीनगर असा एक प्रमुख मार्ग प्रथम सुधारित करण्यात येणार आहे. या मार्गावर आवश्यक ठिकाणी पूल आणि इतर संरचनात्मक कामे केली जाणार असून त्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचा दर्जा पूर्णपणे अद्ययावत केला जाईल.

हेही वाचा –पुणेकरांनो लक्ष द्या! ‘एफ सी’ रोडवरील वाहतुकीत मोठे बदल, ‘हे’ पर्यायी मार्ग वापरा

दुसरा पर्यायी मार्ग विकसित केला जाणार

याशिवाय, शिक्रापूर येथून सुरू होणारा दुसरा पर्यायी मार्ग विकसित केला जाणार आहे. हा मार्ग अहिल्यानगर शहराला वळसा घालत थेट बीड जिल्ह्यात प्रवेश करेल आणि पुढे संभाजीनगरशी जोडला जाईल. हा संपूर्ण ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस हायवे असणार आहे. या मार्गासाठीही १६ हजार ३१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून प्रकल्पाशी संबंधित बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सध्या केवळ एका टोल स्थानांतराचा निर्णय प्रलंबित असून तो झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या प्रक्रियेसाठी अंदाजे दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

पुणे ते नागपूर दोन-अडीच तासांत?

हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर केवळ पुणे ते संभाजीनगरच नव्हे, तर संभाजीनगर ते नागपूर हे अंतरही सुमारे अडीच तासांत पार करता येईल. एकूणच हा एक्स्प्रेस हायवे पुणे ते नागपूर असा विस्तारित दळणवळण मार्ग ठरणार असल्याचे गडकरी यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा – Pune Airport : पुणे विमानतळावरील बिबट्या अखेर जेरबंद! ७ महिन्यांच्या मोहिमेनंतर अडकला पिंजऱ्यात

महाराष्ट्रात रस्ते विकासाला गती

नितीन गडकरी यांनी यावेळी राज्यातील इतर महामार्ग प्रकल्पांबाबतही माहिती दिली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. हडपसर ते यवत महामार्गासाठी सामंजस्य करार झाला असून त्याचे कामही लवकरच सुरू होईल. एनएचएआयच्या माध्यमातून पुणे (खेड) ते नाशिक फाटा हा महामार्ग विकसित केला जाणार असून या प्रकल्पासाठी सुमारे ९३ टक्के जमीन अधिग्रहण पूर्ण झाले आहे. नाशिक ते आळंदी आणि आळंदी ते खेड अशा दोन टप्प्यांत हे काम होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!