Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Beed Crime : कलाकेंद्रात कामाचे आमिष दाखवून बारामतीच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका चार जणांवर गुन्हा दाखल

Beed Crime : कलाकेंद्रात कामाचे आमिष दाखवून बारामतीच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका चार जणांवर गुन्हा दाखल

Beed Crime : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे नृत्याची आवड असलेल्या बारामतीच्या एका तरुणीला कलाकेंद्रात काम आणि पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून बोलावले. मात्र, तिला जबरदस्तीने लॉजमध्ये नेऊन तीन पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २४ एप्रिल २०२५ ची असून, आता पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील पीडितेच्या आईला २४ एप्रिल २०२५ रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ यांचा फोन आला. ‘पायल कलाकेंद्र’मध्ये नृत्यासाठी मुलींची गरज असून, मुलगी आली तर तिला नृत्य शिकता येईल आणि चांगले पैसेही मिळतील, असे आमिष दाखवले. यावर विश्वास ठेवून पीडिता अंबाजोगाईला गेली. मात्र, कलाकेंद्रात राहण्यास नकार दिल्यानंतर बदामबाई आणि इतर दोघांनी तिला बेदम मारहाण केली.

मारहाणीनंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाईतील एका लॉजमध्ये नेले. तिथे बदामबाईने तिला मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात पुरुषाच्या ताब्यात सोडले आणि निघून गेली. तिघांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. नंतर तिला पुन्हा कलाकेंद्रात आणून वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला.

आईने केली सुटका, गुन्हा दाखल

अत्याचारानंतर पीडितेने फोन करून आईला सर्व प्रकार सांगितला. आईने तात्काळ अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आणि बारामतीला परत आणले. बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

या घटनेमुळे बारामती आणि बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!