Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pradnya Satav: काँग्रेसला मोठा धक्का! दिवगंत राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा भाजपमध्ये प्रवेश करणार

Pradnya Satav: काँग्रेसला मोठा धक्का! दिवगंत राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा भाजपमध्ये प्रवेश करणार

Pradnya Satav Joins BJP: काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्या, 18 डिसेंबर रोजी त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. दरम्यान, या घडामोडींवर काँग्रेसकडून सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे. विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी हा दावा फेटाळून लावत, या बातमीत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे राजीव सातव हे काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. मात्र, कोरोना काळात झालेल्या अकाली निधनामुळे त्यांचा राजकीय प्रवास अचानक थांबला.

हेही वाचा – महापालिका रणधुमाळीला सुरुवात! प्रचारासाठी फक्त 12 दिवस; प्रत्येक दिवस ठरणार निर्णायक

प्रज्ञा सातव कोण आहेत?

डॉ. प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव यांनी 2014 ते 2019 या काळात हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गांधी कुटुंबाशी निकट संबंध असलेले राजीव सातव यांचे 2021 मध्ये आजारपणामुळे निधन झाले. प्रज्ञा सातव सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा असून विधानपरिषदेच्या आमदार आहेत. 2021 मध्ये काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा काँग्रेसकडून त्या विधानपरिषदेवर निवडून आल्या असून त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार; भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ४ राऊंड फायर

राजीव सातव यांचा राजकीय प्रवास

राजीव सातव हे राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रातून काँग्रेसचे मोजके खासदार निवडून आले होते, त्यात राजीव सातव यांचा समावेश होता. या यशानंतर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर स्वतःची ठळक ओळख निर्माण केली. पंचायत समिती सदस्यापासून ते लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांपर्यंत त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी तसेच काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली.

सतेज पाटील यांची प्रतिक्रिया

प्रज्ञा सातव यांच्या संभाव्य नाराजीवर प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, काँग्रेसने त्यांना आमदारकी दिली असून त्या असा कोणताही टोकाचा निर्णय घेतील, असे वाटत नाही. ही बातमी निराधार असून पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या सतत संपर्कात आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जर प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला, तर तो काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जाईल, अशी चर्चा आहे. एकेकाळी हिंगोलीच्या राजकारणात दबदबा असलेले राजीव सातव यांच्या नावानेच विरोधक सावध होत असत. संयमी नेतृत्व, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा यामुळे त्यांनी हिंगोलीत काँग्रेसची मजबूत पकड निर्माण केली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील काँग्रेसला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसत असून सध्याच्या घडामोडींमुळे ही चर्चा आणखी तीव्र झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!