पुणे : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. २ जानेवारी २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक, जोखीम व्यवस्थापक, उत्पादक संस्था व्यवस्थापक, भौगोलिक संकेत (जीआय) व्यवस्थापक, इन्क्युबेशन सेंटर/स्टार्टअप व्यवस्थापक यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 17 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ सल्लागार, वित्तीय विश्लेषक, डेटा सायंटिस्ट आणि बीआय डेव्हलपर, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ सांख्यिकी विश्लेषक.
– एकूण रिक्त पदे : 17 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ जानेवारी २०२६.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nabard.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


