Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू; थोड्याच वेळात मतमोजणी, विजयजल्लोषाला निर्बंध

पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू; थोड्याच वेळात मतमोजणी, विजयजल्लोषाला निर्बंध

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, मंचर, शिरूर, राजगुरुनगर (खेड), चाकण यांसह इतर नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक निकालाची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. निकालाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने उत्तर पुणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश (कलम ३७ नुसार) लागू केला आहे.

निकालाची उत्सुकता सर्व स्तरांवर शिगेला पोहोचली असून, उमेदवारांच्या समर्थकांमध्ये विजयाचा आनंद साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, गर्दीमुळे कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. यामुळे विजयाचा आनंद व्यक्त करता येईल, पण मोठ्या प्रमाणात जल्लोष, फटाके फोडणे किंवा रस्त्यावरून मिरवणुका काढण्यावर मात्र कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील या नगरपरिषदांच्या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील थेट सामना असल्याने निकालाकडे विशेष लक्ष लागले आहे. मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होईल आणि निकाल दिवसभरात हळूहळू जाहीर होत राहतील. प्रशासनाने मतमोजणी केंद्रांभोवती मोठा बंदोबस्त तैनात केला असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!