Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bhandara EVM Issue: ईव्हीएमवर उमेदवाराचं नाव गायब केल्याप्रकरणी 7 कर्मचारी निलंबित; बड्या अधिकाऱ्यांना नोटीस

Bhandara EVM Issue: ईव्हीएमवर उमेदवाराचं नाव गायब केल्याप्रकरणी 7 कर्मचारी निलंबित; बड्या अधिकाऱ्यांना नोटीस

Bhandara EVM Issue: राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मात्र, भंडारा नगरपालिकेच्या निवडणुकीत समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकाराने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. मतदान यंत्रावर (EVM) उमेदवाराचे नाव आणि ‘नोटा’चा पर्याय झाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये हा सर्व गोंधळ झाला. या प्रभागात एकूण ५ उमेदवार आणि एक ‘नोटा’ असे ६ पर्याय ईव्हीएमवर असणे आवश्यक होते. मात्र, मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शरद पवार गटाच्या उमेदवार करुणा राऊत यांचे नाव आणि नोटाचा पर्याय चक्क कागदाने झाकला गेला. प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी ईव्हीएमवर केवळ ४ उमेदवारांचीच नावे दिसत होती. आपले नावच मशीनवर नसल्याचे लक्षात आल्यावर उमेदवार करुणा राऊत यांनी संताप व्यक्त करत तक्रार दाखल केली. चौकशीअंती हा प्रकार खरा असल्याचे सिद्ध झाले.

हेही वाचा – NCP Alliance : मुंबईत ठाकरे तर पुण्यात ‘पवार’ एकत्र; ‘या’ दिवशी होणार युतीची अधिकृत घोषणा

जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. मतदान केंद्र प्रमुखासह कर्तव्यात कसूर करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी (प्रांत अधिकारी) माधुरी तिखे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (मुख्याधिकारी) जुम्मा प्यारेवाले यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रशासकीय ताण आणि जबाबदारी

नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे नगरपालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला असला, तरी भंडाऱ्यातील या घटनेने निवडणूक कामकाजात पारदर्शकता आणि सतर्कता किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!