Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

HSRP Number Plate: 16 लाख पुणेकरांवर कारवाईची टांगती तलवार? HSRP नंबरप्लेट बसवण्याकडे वाहनधारकांचे सपशेल दुर्लक्ष

HSRP Number Plate: 16 लाख पुणेकरांवर कारवाईची टांगती तलवार? HSRP नंबरप्लेट बसवण्याकडे वाहनधारकांचे सपशेल दुर्लक्ष

HSRP Number Plate: गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि वाहनांच्या सुरक्षेसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या उच्च सुरक्षा नंबरप्लेट (HSRP) बसविण्याबाबत पुणेकरांनी अद्यापही निरुत्साह दाखवला आहे. ३१ डिसेंबर ही अखेरची तारीख तोंडावर आली असताना, पुण्यातील तब्बल १६ लाख वाहनांना अजूनही जुन्याच नंबरप्लेट आहेत. वारंवार मुदतवाढ देऊनही वाहनधारकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आता परिवहन विभाग पुन्हा मुदतवाढ देणार की दंडात्मक कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे सध्याची आकडेवारी?

पुणे शहरात साधारणपणे २६ लाखांहून अधिक वाहनांना ही सुरक्षा नंबरप्लेट बसवणे आवश्यक आहे. मात्र, ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ १० लाख वाहनधारकांनी नोंदणी केली आहे. तथापी, फक्त ८ लाख वाहनांवर ही नंबरप्लेट बसवून पूर्ण झाली आहे. तथापी, डिसेंबर या शेवटच्या महिन्यात आतापर्यंत फक्त ५० हजार जणांनीच नोंदणीसाठी पुढाकार घेतला आहे. तसेच १६ लाख म्हणजेचं अद्याप ६५ टक्के वाहनांचे काम बाकी आहे.

हेही वाचा – Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ‘या’ तारखेपर्यंत होणार सुरू

सुरक्षा नंबरप्लेट का महत्त्वाची?

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना ही प्लेट बसवणे बंधनकारक आहे. चोरीच्या वाहनांचा वापर करून होणारे गुन्हे रोखण्यासाठी आणि अपघातग्रस्त वाहन शोधण्यासाठी या नंबरप्लेटची मोठी मदत होते. या नंबरप्लेटमध्ये लेझर कोड आणि विशेष सुरक्षा फिचर्स असल्याने त्यासह छेडछाड करणे कठीण असते.

मुदतवाढीनंतरही नागरिकांचे दुर्लक्ष

परिवहन विभागाने आत्तापर्यंत ५ वेळा या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला ‘फिटमेंट सेंटर’ (नंबरप्लेट बसवण्याची केंद्रे) कमी असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती. आरटीओने ही संख्या वाढवूनही नागरिक मात्र केंद्रांकडे फिरकताना दिसत नाहीत. सध्याचा नोंदणीचा वेग पाहता, उरलेली १६ लाख वाहने कव्हर करण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची चिन्हे आहेत. ३१ डिसेंबरनंतर आरटीओ थेट कारवाई सुरू करणार की पुन्हा एकदा ‘तारीख पे तारीख’ देणार, याबाबत संभ्रम आहे. मात्र, कारवाई सुरू झाल्यास पुणेकरांना मोठा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!