Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवारांच्या मनधरणीसाठी भाजपचा मोठा निर्णय; ऐन निवडणूकीदरम्यान ‘या’ नेत्याची उचलबांगडी

Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवारांच्या मनधरणीसाठी भाजपचा मोठा निर्णय; ऐन निवडणूकीदरम्यान ‘या’ नेत्याची उचलबांगडी

Chandrapur Municipal Election: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनातील खदखद व्यक्त केली होती. “आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली”, असे विधान त्यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुनगंटीवार यांची चर्चा झाली. एकीकडे महापालिका निवडणूकीची जोरदार तयारी सुरु झाली असतानाच भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने आमदार किशोर जोरगेवार यांना महापालिका निवडणूक प्रमुखपदावरून हटवले आहे.

जोरगेवार यांच्या जागी आता माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मुनगंटीवार यांची नाराजी कमी करण्यासाठी जोरगेवार यांच्या ऐवजी संचेती यांची निवड करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

किशोर जोरगेवारांना मुनगंटीवारांचा विरोध

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात आधीपासूनच संघर्ष आहे. अपक्ष आमदार असताना किशोर जोरगेवार यांना भाजपमध्ये घेण्यास मुनगंटीवार यांनी विरोध केला होता. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षात घेण्यात आले होते. यावरून आम्ही फक्त संतरज्या उचलायच्या का, अशी भावना कार्यकर्त्यांची असल्याचे मुनगंटीवार म्हणाले होते. पण, पक्षाने त्यांचा विरोध डावलून जोरगेवार यांना पक्षात प्रवेश दिला.

मुनगंटीवार यांनी पक्षालाच खडेबोल सुनावले

नगरपरिषद-नगर पंचायत निवडणुकीमध्ये भाजपने चांगले यश मिळवले. पण, चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही. या निकालानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाला खडेबोल सुनावले होते. ‘जसे शनिशिंगणापूरला दरवाजे नाहीत, तसे आमच्या पक्षालाही दरवाजे नाहीत. कोणीही येतो, कोणीही जातो’, असे म्हणत मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!