पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, भारत सरकारच्या एका विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई येथे प्रकल्प व्यवस्थापक-तथा-पर्यवेक्षण व संस्थात्मक तज्ज्ञ, संवर्धन वास्तुविशारद, संस्कृती व वारसा तज्ज्ञ, पर्यटन (सांस्कृतिक) विपणन व प्रसिद्धी तज्ज्ञ, सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तज्ज्ञ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत पाच रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2026 ही असणार आहे.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 200000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. ६० वर्षांपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
26 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


