Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Meenakshi Shinde Resignation : एकनाथ शिदेंच्या बालेकिल्ल्यात मोठा राजकीय भूकंप! माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

Meenakshi Shinde Resignation : एकनाथ शिदेंच्या बालेकिल्ल्यात मोठा राजकीय भूकंप! माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

Meenakshi Shinde Resignation : ठाणे महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) आक्रमक नेत्या, माजी महापौर आणि महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका बड्या महिला नेत्याने पद सोडल्याने ठाणे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

राजीनाम्यामागील ‘इनसाईड’ स्टोरी

अधिकृतपणे राजीनामा देताना मीनाक्षी शिंदे यांनी ‘सध्याच्या राजकीय परिस्थितीत काम करण्यास असमर्थ’ असल्याचे कारण दिले असले, तरी यामागे अंतर्गत गटबाजीचे मोठे कारण असल्याची चर्चा आहे. हा संपूर्ण वाद विक्रांत वायचळ यांच्या हकालपट्टीवरून सुरू झाल्याचे समजते.

हेही वाचा – ‘मी ठाकरेंसारखा कागदी वाघ नाही, तर डरकाळी फोडणारा…’; राज ठाकरेंच्या ‘दानव’ टिप्पणीवर रावसाहेब दानवेंचा पलटवार

काय आहे नेमका वाद?

माजी नगरसेवक भूषण भूईरे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, यासाठी काही स्थानिक नेत्यांनी आणि शाखाप्रमुखांनी तीव्र विरोध दर्शवला होता. यामध्ये मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मनोरमा नगरचे शाखाप्रमुख विक्रांत वायचळ आघाडीवर होते. पक्षविरोधी हालचाली केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने वायचळ यांची पक्षातून हकालपट्टी केली. आपल्या खंद्या कार्यकर्त्यावर झालेली ही कारवाई मीनाक्षी शिंदे यांच्या जिव्हारी लागली आणि त्यातूनच त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा – Thackeray Alliance: ‘मराठी अस्मितेसाठी इंजिन आणि मशाल एकवटली’; 7 महापालिकांसाठी ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युती जाहीर

एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?

ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. महानगरपालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना जोर लावत असतानाच, पक्षातील जुन्या आणि निष्ठावान नेत्यांमध्ये नाराजी पसरणे हा मोठा धक्का मानला जात आहे. महिला आघाडीत मीनाक्षी शिंदे यांचा मोठा प्रभाव असून, त्यांच्या राजीनाम्यामुळे निवडणुकीच्या प्रचारावर आणि महिला कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते मध्यस्थी करणार का, की ठाण्यातील राजकारणात आणखी काही मोठी गळती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐन रणधुमाळीत हे ‘नाराजीनाट्य’ शिवसेनेला किती महागात पडणार, हे येणारा काळच ठरवेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!