Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हातात बेड्या, तोंडावर स्कार्फ…बंडू आंदेकरची ‘सिनेस्टाईल’ एन्ट्री; पोलीस व्हॅनमधून येत भरला उमेदवारी अर्ज

हातात बेड्या, तोंडावर स्कार्फ…बंडू आंदेकरची ‘सिनेस्टाईल’ एन्ट्री; पोलीस व्हॅनमधून येत भरला उमेदवारी अर्ज

Bandu Andekar : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एका धक्कादायक दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने हातात बेड्या आणि तोंडावर स्कार्फ असलेल्या अवस्थेत पोलीस बंदोबस्तात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, यावेळी आंदेकर कुटुंबातील इतर सदस्यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

नेकी का काम, आंदेकर का नाम!

अर्ज भरण्यासाठी पोलीस व्हॅनमधून उतरताच बंडू आंदेकरने जोरदार घोषणाबाजी केली. “मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही,” असे म्हणत त्याने मतदारांना साद घातली. ‘आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत’, “वनराज आंदेकर जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. बंडू आंदेकर यांच्यासोबतच लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनीही आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.

हेही वाचा – बंडू आंदेकर टोळीतील आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या; स्वारगेट परिसरात सापळा रचून केली अटक

कोणत्या पक्षाकडून उमेदवारी?

बंडू आंदेकर नेमक्या कोणत्या पक्षाकडून लढणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी यापूर्वी लक्ष्मी आणि बंडू आंदेकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. बंडू आंदेकर यांचा मुलगा स्वर्गीय वनराज आंदेकर हे अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नगरसेवक होते. आता त्याच राजकीय वारशावर आंदेकर कुटुंब पुन्हा दावा करत असल्याचे चित्र आहे.

पोलिस व्हॅनमधून ‘एन्ट्री’ची चर्चा

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने पोलीस कोठडीत असताना अशा प्रकारे घोषणाबाजी करत अर्ज भरल्यामुळे पुण्याच्या राजकारणात गुन्हेगारीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तथापी, ‘लोकशाहीत मला कसं वागवलं जातंय,’ असा सवाल करत आंदेकरने यावेळी सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!