Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

iPhone पासून ते MacBook पर्यंत Apple ने 2025 मध्ये बंद केले अनेक प्रॉडक्ट्स

iPhone पासून ते MacBook पर्यंत Apple ने 2025 मध्ये बंद केले अनेक प्रॉडक्ट्स

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध ब्रँड असलेल्या Apple ची क्रेझ अजूनही कायम आहे. कंपनीकडून अनेक गॅजेट्स लाँच केली जात आहेत. या वर्षी अॅपलने अनेक प्रॉडक्ट्स लाँच केली आहेत आणि अनेक इतर उत्पादने बंद केली आहेत. म्हणजेच ती आता तयार केली जाणार नाहीत. यामध्ये आयफोनपासून मॅकबुकपर्यंतच्या प्रॉडक्ट्सचा समावेश आहे.

कंपनीने २०२५ मध्ये एकूण २५ उत्पादने बंद केली आहेत. एखादे उत्पादन बंद करणे म्हणजे ब्रँड ते आता तयार करणार नाही. मात्र, विक्री सुरूच राहते. युनिट संपेपर्यंत कंपनी ही उत्पादने विकते. यावर्षी, कंपनीने सात स्मार्टफोन बंद केले आहेत. या यादीत आयफोन एसई (तिसरे व्हर्जन), आयफोन १४ सीरीज, आयफोन १५ सीरीज आणि आयफोन १६ प्रो सीरीजचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने तीन आयपॅड बंद केले आहेत. या यादीत आयपॅड (१० व्हर्जन), आयपॅड एअर (एम२) आणि आयपॅड प्रो (एम४) यांचा समावेश आहे. कंपनी यापुढे ही प्रॉडक्ट्स तयार करणार नाही.

तसेच, अ‍ॅपलने मॅकबुक एअर एम२, एम३, मॅकबुक प्रो १४-इंच (एम४) आणि मॅक स्टुडिओ (एम२ मॅक्स आणि एम२ अल्ट्रा) बंद केले आहेत. ऍपल वॉच सीरीज १०, अ‍ॅपल वॉच अल्ट्रा २ आणि अ‍ॅपल वॉच एसई (दुसरी व्हर्जन) बंद करण्यात आली आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!