BJP Candidates List : मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना पक्षाने पहाटेपर्यंत अनेक इच्छुकांना फॉर्म दिले आहेत. भाजपने अनुभवी माजी नगरसेवकांसह युवा नेत्यांना संधी देत नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवला आहे. विशेष म्हणजे, आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.
भाजप मुंबईत १२८ जागांवर निवडणूक लढवणार असून, अधिकृत उमेदवार यादी लवकरच जाहीर केली जाईल. पक्षाने आतापर्यंत एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांमध्ये मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मानले जाणारे नवनाथ बन यांचा समावेश आहे. याशिवाय नव्या युवा नेत्यांना प्राधान्य दिल्याचे दिसते.
भाजपने एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची नावे
– तेजिंदर तिवाना
– नवनाथ बन
– सनी तानप राठी
– जितेंद्र पटेल
– शिवानंद शेट्टी
– तेजस्वी घोसाळकर
– श्वेता कोरगावकर
– शिल्पा सांगुरे
– गणेश खणकर
– राजश्री शिरोडकर
– आकाश पुरोहित
– बाळा तावडे
– विनोद मिश्रा
– अक्षता नार्वेकर
हे उमेदवार लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, भाजपची अधिकृत यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. बीएमसीवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.


