नवी दिल्ली : जगप्रसिद्ध ब्रँड असलेल्या Apple ची क्रेझ अजूनही कायम आहे. कंपनीकडून अनेक गॅजेट्स लाँच केली जात आहेत. या वर्षी अॅपलने अनेक प्रॉडक्ट्स लाँच केली आहेत आणि अनेक इतर उत्पादने बंद केली आहेत. म्हणजेच ती आता तयार केली जाणार नाहीत. यामध्ये आयफोनपासून मॅकबुकपर्यंतच्या प्रॉडक्ट्सचा समावेश आहे.
कंपनीने २०२५ मध्ये एकूण २५ उत्पादने बंद केली आहेत. एखादे उत्पादन बंद करणे म्हणजे ब्रँड ते आता तयार करणार नाही. मात्र, विक्री सुरूच राहते. युनिट संपेपर्यंत कंपनी ही उत्पादने विकते. यावर्षी, कंपनीने सात स्मार्टफोन बंद केले आहेत. या यादीत आयफोन एसई (तिसरे व्हर्जन), आयफोन १४ सीरीज, आयफोन १५ सीरीज आणि आयफोन १६ प्रो सीरीजचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने तीन आयपॅड बंद केले आहेत. या यादीत आयपॅड (१० व्हर्जन), आयपॅड एअर (एम२) आणि आयपॅड प्रो (एम४) यांचा समावेश आहे. कंपनी यापुढे ही प्रॉडक्ट्स तयार करणार नाही.
तसेच, अॅपलने मॅकबुक एअर एम२, एम३, मॅकबुक प्रो १४-इंच (एम४) आणि मॅक स्टुडिओ (एम२ मॅक्स आणि एम२ अल्ट्रा) बंद केले आहेत. ऍपल वॉच सीरीज १०, अॅपल वॉच अल्ट्रा २ आणि अॅपल वॉच एसई (दुसरी व्हर्जन) बंद करण्यात आली आहेत.


