पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत आता अर्ज करता येणार आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई येथे वरिष्ठ रहिवासी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत २८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ०९, १२ आणि १३ जानेवारी २०२६ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार असून, त्यासाठी डीन कार्यालय, तिसरा मजला, ईएसआयसी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००९३ येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


