Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महापालिका निवडणुकांपूर्वीच राजकीय भूकंप ! 70 नगरसेवक बिनविरोध; राज ठाकरेंनी व्यक्त केली शंका, म्हणाले…

महापालिका निवडणुकांपूर्वीच राजकीय भूकंप ! 70 नगरसेवक बिनविरोध; राज ठाकरेंनी व्यक्त केली शंका, म्हणाले…

Raj Thackeray: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मतदानाला अवघे १२ दिवस शिल्लक असतानाच राज्यातील ७० उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या अभूतपूर्व घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

अशी निवडणूक कधीच पाहिली नाही – राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या बिनविरोध निवडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात मी अशा प्रकारची निवडणूक कधीच पाहिली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मी अनेक निवडणुका जवळून अनुभवल्या, पण इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची परिस्थिती पहिल्यांदाच पाहतोय. ठाण्याचे मनसे नेते अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि राजू पाटील यांनी ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंची भेट घेतली, त्यानंतर हे विधान समोर आले.

हेही वाचा – 1 लाख घरे, मोफत वीज, 10 रुपयात जेवण…! आदित्य-अमित ठाकरेंनी मुंबईकरांसाठी सादर केला विकासाचा मास्टरप्लॅन

बिनविरोध विजयी होण्यामध्ये महायुतीने बाजी मारली आहे:

  • भाजप: सर्वाधिक ४४ उमेदवार बिनविरोध.
  • शिवसेना (शिंदे गट): २२ नगरसेवक बिनविरोध.
  • कल्याण-डोंबिवली पॅटर्न: येथे भाजपचे १५ आणि शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
  • इतर: अजित पवारांची राष्ट्रवादी (२), इस्लाम पार्टी (१) आणि अपक्ष (१).

निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये

एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राज्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. विरोधी उमेदवारांना धमकावून किंवा प्रलोभन दाखवून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले का, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून या संदर्भात सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित उमेदवारांना विजयी घोषित केले जाणार नाही. या घडामोडींमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!