Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात राष्ट्रवादी उमेदवाराच्या ‘टॉर्चर’ला कंटाळून तरुणाची आत्महत्या; ३० पानांची सुसाईड नोट, हातावर नावे कोरली

पुण्यात राष्ट्रवादी उमेदवाराच्या ‘टॉर्चर’ला कंटाळून तरुणाची आत्महत्या; ३० पानांची सुसाईड नोट, हातावर नावे कोरली

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर परिसरातील प्रभाग क्रमांक ४१ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार फारुख शेख यांच्या सततच्या त्रासाला आणि टॉर्चरला कंटाळून सादिक उर्फ बाबू कपूर (वय ५६) यांनी आत्महत्या केली आहे.

सादिक यांनी आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आयुष्य संपवले. मृत्यूपूर्वी त्यांनी ३० पानांची सुसाईड नोट लिहिली असून, हाताच्या पंजावरही काही नावे कोरली आहेत. सुसाईड नोटमध्ये फारुख शेख यांच्यासह अनेक व्यक्तींच्या नावांचा उल्लेख आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सय्यद नगर भागात सादिक यांची ५ गुंठे जमीन होती. यावरून फारुख शेख यांच्यात त्यांचा दीर्घकाळ वाद सुरू होता. फारुख शेख यांच्याकडून सादिक यांना सतत त्रास आणि धमकी मिळत होत्या, असा दावा सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून सादिक यांनी टोकाचे पाऊल उचलले. लष्कर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.

सादिक उर्फ बाबू कपूर यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्यांच्यावर यापूर्वी मकोका कायद्यांतर्गत कारवाई झाली होती. या प्रकरणामुळे निवडणुकीच्या प्रचारात खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी उमेदवार फारुख शेख यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत.

पोलिस सुसाईड नोटमधील नावांचा तपास करत आहेत. या घटनेमुळे प्रभाग ४१ मधील निवडणुकीचे वातावरण तापले आहे. पुणे महापालिका निवडणूक १५ जानेवारीला होणार असून, अशा घटनांमुळे राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!