पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या विभागात रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
शासकीय तंत्रनिकेतन, नागपूर येथे व्हिजिटिंग लेक्चरर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.gpnagpur.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : व्हिजिटिंग लेक्चरर.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : ०६ जानेवारी २०२६.
– मुलाखतीचा पत्ता : शासकीय पॉलिटेक्निक, मंगळवारी बाजार, सदर, नागपूर 440001 (महाराष्ट्र राज्य).


