नवी दिल्ली : तुम्ही घरात मोठा टीव्ही जो थिएटरसारखा अनुभव देईल याची बाळगत असाल तर आता तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे. कारण, 100 इंचाचा टीव्ही खिशात ठेवता येणार आहे. जर तुम्हाला तुमच्या खिशात १०० इंचाचा टीव्ही ठेवता आला तर? तुम्ही तो बाहेर काढून तुम्हाला हवा तेव्हा वापरण्यास सुरुवात करू शकता.
एक मिनी प्रोजेक्टर आहे जो मोठ्या टीव्हीचा अनुभव आपल्या देऊ शकेल. तुम्ही तुमच्या खिशात ठेवू शकेल. पोर्ट्रोनिक्स असाच एक प्रोजेक्टर विकत आहे, जो तुम्हाला १०० इंचाचा स्क्रीन प्रोजेक्ट करण्याचे फीचर देतो. हा प्रोजेक्टर बिल्ट-इन बॅटरी आणि स्पीकर्ससह येतो. याचा अर्थ तुम्हाला ते वापरण्यासाठी विजेची आवश्यकता भासणार नाही. डिव्हाईस ऑटोमॅटिक स्पीकर सुरु करेल. पोर्ट्रोनिक्स पिको १४ प्रोजेक्टर हा बेस्ट ठरत आहे.
पोर्ट्रोनिक्सचा हा प्रोजेक्टर अँड्रॉइड १३ वर ऑपरेट होतो. ड्युअल-बँड वाय-फाय ऑफर करतो. हा एक स्मार्ट प्रोजेक्टर असल्याने, तो विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर चालतो. यामध्ये नियंत्रणासाठी रिमोट कंट्रोल आहे. त्याचे वजन फक्त २५० ग्रॅम आहे. फक्त ६० मिमी उंच आणि ७३ मिमी रुंद, तो तुमच्या खिशात बसू शकतो.


