Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Beed Crime: बीडमध्ये दिवसाढवळ्या थरार! खड्डा खोदणाऱ्या मजुराची गोळी झाडून हत्या

Beed Crime: बीडमध्ये दिवसाढवळ्या थरार! खड्डा खोदणाऱ्या मजुराची गोळी झाडून हत्या

Beed Crime: जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बीड शहरात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील अंकुश नगर भागात नगरपरिषदेचे काम करत असताना एका मजुराची गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. हर्षद शिंदे असे मृत मजुराचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश नगर परिसरात नगरपरिषदेच्या वतीने खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. हर्षद शिंदे हे तिथे रोजंदारीवर काम करत होते. दरम्यान, अचानक गोळीबाराचा आवाज झाला आणि हर्षद रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Solapur Crime: एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट! सोलापूरच्या स्नेहाची अक्कलकोटमध्ये हत्या

आरोपी फरार, पोलिसांची पथके रवाना

गोळीबार केल्यानंतर संशयित आरोपी विशाल सूर्यवंशी हा घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून पंचनामा पूर्ण केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

बीडमध्ये दहशतीचे सावट

भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या झालेल्या या खुनामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष तपास पथके तयार केली असून ठिकठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!