Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Election 2026: महापुरुषांच्या पुतळ्यासमोर महिलांचा डान्स; भाजप उमेदवाराच्या प्रचारातील ‘त्या’ कार्यक्रमावरून मुंबईत संताप

BMC Election 2026: महापुरुषांच्या पुतळ्यासमोर महिलांचा डान्स; भाजप उमेदवाराच्या प्रचारातील ‘त्या’ कार्यक्रमावरून मुंबईत संताप

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कुर्ला परिसरातील वॉर्ड क्रमांक १५७ मधील भाजप उमेदवार आशाताई तायडे यांच्या प्रचार सभेत चक्क महिलांच्या अश्लील डान्सचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा नाचगाण्याचा कार्यक्रम झाला, तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. या कृत्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

गर्दी खेचण्यासाठी नाचगाण्याचा ‘फंडा’

मुळात हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र, केवळ समाजसेवा न करता मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि गर्दी जमवण्यासाठी तिथे गाण्यांच्या तालावर महिलांना नाचवण्यात आले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला असून, महापुरुषांच्या प्रतिमेसमोर अशा प्रकारे कृत्य करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.

‘सिद्धिविनायक ट्रस्ट’च्या कोषाध्यक्षांवर निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी हा व्हिडिओ ट्विट करत भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहेत. त्यांनी थेट भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना सवाल विचारला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक पवन त्रिपाठी आहेत, ज्यांना भाजपने सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष पद दिले आहे. पवित्र मंदिरांवर अशा लोकांची नेमणूक करताना भाजपला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत चित्रे यांनी आपला संताप व्यक्त केला.

बदललेली राजकीय समीकरणे अन् भाजपची अडचण

मुंबईत यंदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची मानली जात आहे. त्यातच उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्याने ठाकरे गटाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या युतीमुळे महायुतीसमोर (भाजप-शिवसेना) मोठे आव्हान उभे ठाकले असताना, अशा वादांमुळे भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदारांना आमिष दाखवण्यासाठी आणि महापुरुषांचा अनादर करण्यासाठी भाजपने हा खालचा स्तर गाठल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!