पुणे : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे प्रकल्प सहयोगी यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु. 49,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : ३५ वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई- मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2026
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : sourav.dutta@tifr.res.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.tifr.res.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


