Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Arjun tendulkar Saaniya Chandhok wedding: अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

Arjun tendulkar Saaniya Chandhok wedding: अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding Date: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर २०२६ मध्ये बोहल्यावर चढणार आहे. तेंडुलकरांच्या घरी धाकट्या लेकाच्या लग्नसोहळ्याची लगबग पाहायला मिळेल. अर्जुन तेंडुलकर सानिया चंडोक हिच्याबरोबर लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती रिपोर्टमध्ये समोर आली आहे. इतकंच नव्हे तर या दोघांच्या लग्नाची तारीखदेखील समोर आली आहे. लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात होणार आहे.

अर्जुन तेंडुलकर व सानिया चंडोक यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये खाजगी सोहळ्यात साखरपुडा केला होता. दोन्ही कुटुंबीय व जवळचे मित्र मैत्रिणी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. तेंडुलकर व चंडोक कुटुंबियांनी गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर आता २०२६ मध्ये लग्नसोहळा पार पडणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक ५ मार्च २०२६ रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. लग्नापूर्वीचे विधी ३ मार्चपासून सुरू होतील. तर ४ मार्चला होळीचा सण देखील असणार आहे, त्यामुळे सणादरम्यान लग्नसोहळा असल्याने जोरदार सेलिब्रेशन होणार आहे.

एका सूत्राच्या हवाल्याने वृत्तात म्हटलं आहे की, “लग्नाचे बरेचसे विधी मुंबईत होतील. जेमार्च रोजी सुरू होतील आणि फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य कार्यक्रमांना उपस्थित राहतील.” याबाबत अधिक माहितीसाठी सचिन तेंडुलकरच्या कुटुंबाशीही संपर्क साधला, परंतु सध्या कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

सानिया ही एक यशस्वी उद्योजिका आहे. ती मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानियाकडे पेट केअर ब्रँडची मालकिणदेखील आहे आणि ती तेंडुलकर कुटुंबाला खूप काळापासून ओळखते. सानिया ही सारा तेंडुलकर व अर्जुनची बालपणीची मैत्रिणदेखील आहे. सारा अनेकदा सानिया चंडोकबरोबर फोटो शेअर करत असते. इतकंच नव्हे तर तेंडुलकर कुटुंबांच्या कार्यक्रमांना व सहलींना देखील सानिया दिसली आहे. साराच्या पिलाटेस अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्यालादेखील ती उपस्थित होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!