मुंबई : शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात पीएल कॅपिटलच्या स्टॉकमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. कंपनीचा हा स्टॉक २१४० रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. २०२८ पर्यंत कंपनीचे मूल्यांकन ३२ पट पोहोचू शकते. ब्रोकरेजला स्टॉकवर खरेदी रेटिंग आहे.
कोफोर्जच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत ३२ टक्के वाढ दिसून येत आहे. ब्रोकरेजचा अंदाज आहे की, २०२८ पर्यंत कंपनीचे मूल्यांकन ३२ पट पोहोचू शकते. पीएल कॅपिटलने म्हटले आहे की, कोफोर्जने आर्थिक वर्ष २०२०-२५ दरम्यान अंदाजे १४% सीएजीआर नोंदवला आहे. प्रामुख्याने बीएफएसआय आणि टीटीएचमधील मजबूत वाढीमुळे, जे एकत्रितपणे महसुलाच्या अंदाजे ५०% आहेत. ब्रोकरेज फर्मने व्यवहारांमधील प्रगतीकडे लक्ष वेधले.
आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत कोफोर्जने १० मोठी डील केली. तर आर्थिक वर्ष २०२५ च्या संपूर्ण वर्षात फक्त १४ डील झाली. १५ टक्क्यांच्या सातत्यपूर्ण वाढीचा विश्वास कंपनीला आहे. गेल्या पाच वर्षांत, मध्यम आणि उच्च श्रेणीतील क्लायंटमध्ये २०% पेक्षा जास्त CAGR वाढ दिसून येत आहे.


