पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकतो.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे वैधानिक लेखापरीक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सांगली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैधानिक लेखापरीक्षक.
– नोकरीचे ठिकाण : सांगली.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2026.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यालयाकडील ऑडीट / इन्स्पेक्शन विभाग, पद्मभूषण वसंतदादा पाटील मार्ग, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, सांगली, महाराष्ट्र, भारत – 416 416.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.sanglidccbank.com/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


