Today शनिवार, 31st ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना प्रभाग १० मधील भाजप उमेदवारांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना प्रभाग १० मधील भाजप उमेदवारांनी वाहिली श्रद्धांजली

पुणे: भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ यांना भाजपचे उमेदवार किरण दगडे, रूपाली सचिन पवार,अल्पना गणेश वरपे आणि दिलीप वेडे पाटील यांनी प्रचारादरम्यान श्रद्धांजली अर्पण केली. या भावनिक क्षणानंतर प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली.

गुरुवारी (दि. ८) सकाळी उमेदवार व कार्यकर्ते एकत्र येत माधव गाडगीळ यांना अभिवादन करण्यात आले. गाडगीळ यांनी सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि जनहितासाठी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. “त्यांचे विचार आणि कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच आपण लोकहिताचा राजकारणाचा मार्ग स्वीकारला पाहिजे,” असे मत किरण दगडे यांनी व्यक्त केले.

रूपाली सचिन पवार यांनी गाडगीळ यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, त्यांनी सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी आयुष्य झोकून दिले. अल्पना गणेश वरपे यांनी त्यांच्या विचारसरणीचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे नमूद केले. दिलीप वेडे पाटील यांनीही श्रद्धांजली अर्पण करताना, विकासासोबतच मूल्याधिष्ठित राजकारणाची गरज अधोरेखित केली.

श्रद्धांजली कार्यक्रमानंतर भाजपच्या प्रचाराला उत्साहात सुरुवात झाली. उमेदवारांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत पक्षाच्या विकासात्मक योजना, केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती दिली. घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर देण्यात आला.

कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. “विकास, विश्वास आणि पारदर्शकता” या मुद्द्यांवर आधारित प्रचार केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. माधव गाडगीळ यांच्या स्मृतींना अभिवादन करत सुरू झालेला हा प्रचार आगामी निवडणुकीत नवा संदेश देणारा ठरेल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!