Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: वडगाव शेरीत मध्यरात्री राडा, दोन गट भिडले; दगडफेकीनंतर नागरिकांचा संताप

Pune Crime: वडगाव शेरीत मध्यरात्री राडा, दोन गट भिडले; दगडफेकीनंतर नागरिकांचा संताप

Pune Crime: राज्याच्या महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत गुन्हेगारी घटनांनी डोकं वर काढलं असून पुण्यातील वडगाव शेरी परिसर काल रात्री हिंसाचाराने हादरला. सोपाननगर भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये भीषण राडा झाला असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

सोपाननगरमध्ये थरार; रस्त्यावर दगडफेक आणि गोंधळ

वडगाव शेरीतील सोपाननगर परिसरात काल रात्री उशिरा दोन गट एकमेकांसमोर आले. किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर तरुणांनी एकमेकांवर मोठमोठे दगड भिरकावण्यास सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रस्त्यावर पडलेल्या दुचाकी आणि हातात दगड घेऊन फिरणारे युवक स्पष्टपणे दिसत आहेत. या राड्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली असून, ‘भयमुक्त वडगाव शेरी’ची मागणी आता नागरिक करू लागले आहेत.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

सोलापूर, अकोट आणि खोपोलीतील अलीकडच्या हिंसक घटनांनंतर पुण्यात झालेला हा प्रकार पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या पोलीस प्रशासनावर या घटनेमुळे अतिरिक्त ताण आला आहे. सीसीटीव्ही आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलीस आता या दंगलखोर युवकांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाण्यातही राजकीय संघर्ष; आव्हाड आणि मुल्ला समर्थक आमनेसामने

पुण्यासोबतच ठाण्यातील राबोडी परिसरातही काल रात्री राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील (शरद पवार गट आणि अजित पवार गट) कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणाव निर्माण झाला होता. आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राबोडीत गेले असता, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या समर्थकांनी त्यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. आव्हाड समर्थकांनीही याला जोरदार प्रत्युत्तर देत घोषणाबाजी केल्याने परिसरात काही काळ संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शहरांमध्ये अशा प्रकारे राजकीय वातावरण तापू लागल्याने पोलिसांना आता कडक पावले उचलावी लागणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!