Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिक कट्टे उभारणार; प्रभाग 10 मधील भाजपच्या उमेदवारांची ग्वाही

विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिक कट्टे उभारणार; प्रभाग 10 मधील भाजपच्या उमेदवारांची ग्वाही

पुणे: शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी हास्यक्लब आणि योगा ही गुरुकिल्ली आहे. या हास्यक्लब आणि योगा ग्रुपची संख्या वाढण्यासाठी प्रभागात ठिकठिकाणी सुसज्ज आणि प्रदूषणविरहीत जागा उपलब्ध करून विरंगुळा केंद्र आणि ज्येष्ठ नागरिक कट्टे उभारणार असल्याचे आश्वासन भाजपचे उमेदवार किरण दगडे, रूपाली पवार, अल्पना वरपे आणि दिलीप वेडेपाटील यांनी हास्यक्लब आणि योगा ग्रुपच्या सदस्यांना दिले.

प्रभाग १० मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किरण दगडे पाटील, रुपाली सचिन पवार, अल्पना गणेश वरपे आणि दिलीप वेडेपाटील यांनी भुसारी कॉलनी आणि बावधन परिसरातील हास्यकलब आणि योगा ग्रुपच्या सदस्यांची भेट संवाद साधला. या वेळी नागरिकांनी उमेदवारांनी प्रभागात केलेल्या विकासकामाचे कौतुक करत, भविष्यात स्वच्छ, सुंदर यासह सुदृढ आणि प्रदूषणविरहीत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजनांची सूचना केली. त्यावर उमेदवारांनी त्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले, तसेच आरोग्य, स्वच्छता, उद्याने, पादचारी मार्ग, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या ठोस उपाययोजनांची माहिती उमेदवारांनी दिली.

त्यानंतर दिवसभराच्या गृहभेटीत नागरिकशी संवाद साधताना पाणीपुरवठा, वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अपेक्षा मांडल्या. त्यावर उमेदवारांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन देऊन प्रभागाचा सर्वसमावेशक विकास आणि पारदर्शक कारभारावर भर देण्यात येईल, असा विश्वासही दिला. महिलांनी उमेदवारांना औक्षण करत शुभेच्छा दिल्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!