Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News: पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनीअरची आत्महत्या; लॅपटॉपच्या चार्जरने गळफास, धक्कादायक कारण समोर

Pune News: पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनीअरची आत्महत्या; लॅपटॉपच्या चार्जरने गळफास, धक्कादायक कारण समोर

Pune News: पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या इंजिनीअरने कंपनीमधील टॉयलेटमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी या इंजिनीअरने आईला मोबाइलवरून मेसेज केला होता. या घटनेमुळे टीसीएस कंपनीत खळबळ उडाली. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतेदह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

टीसीएस कंपनीत

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी आईटी पार्कमधील टीसीएस कंपनीत ही धक्कादायक घटना घडली. सुजल विनोद ओसवाल ( २४ वर्षे) या सॉफ्टवेअर इंजिनीअरने आत्महत्या केली. तो पुण्यातील वानवडी परिसरामध्ये राहायला होता. हिंजवडीतील टीसीएस कंपनीमध्ये तो कामाला होता. कंपनीच्या टॉयलेटमध्ये जाऊन लॅपटॉपच्या चार्जिंग वयारने गळफास घेत त्याने आत्महत्या केली.

बेटिंगमध्ये मोठं नुकसान

सुजल विनोद ओसवालने बेटिंगमध्ये मोठं नुकसान झाल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासातून उघड झाले. त्याने आईला जीवाचे बरे वाईट करून घेतो असा मेसेज करून आत्महत्या केली. त्याने आत्महत्या केल्यामुळे कंपनीत एकच खळबळ उडाली. कंपनीने हिंजवडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुजलचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!