Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजचा खास उपक्रम; राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने शेटफळ गढे येथे 400 वृक्षांची लागवड

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजचा खास उपक्रम; राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने शेटफळ गढे येथे 400 वृक्षांची लागवड

इंदापूर : प्रतिनिधी

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने वृक्षारोपण महाअभियान २०२६ अंतर्गत मौजे शेटफळ गढे येथे मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमात एनएसएसच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सकाळपासून दुपारपर्यंत श्रमदान करत ४०० हून अधिक देशी वृक्षांची लागवड केली.

पर्यावरण संवर्धन

पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता जपण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी लागणारे बहुतांश वृक्ष वेदांत ॲग्री टुरिझमचे डायरेक्टर अरविंद मुळीक यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. यासोबतच काही वृक्ष देवराई प्रकल्पाच्या माध्यमातून प्राप्त करण्यात आले. या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमास बारामतीग्रो लिमिटेड शुगर डिव्हिजन यांचेही सहकार्य लाभले.

विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी

या कार्यक्रमास विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूरचे एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. सदानंद भुसे, प्रा. रणजीत गोरे, प्रा. सचिन पवार, प्रा. अर्चना बिचकुले, प्रा. प्रियांका सूर्यवंशी यांची उपस्थिती लाभली. तसेच वेदांत ॲग्री टुरिझमचे श्री. प्रमोद मुळीक व अरविंद मुळीक हे मान्यवरही कार्यक्रमास उपस्थित होते. या शिबिरासाठी प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

पर्यावरण रक्षणाचा संदेश

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची कृती न राहता त्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही वृक्षसंवर्धनाचा संकल्प व्यक्त करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

या उपक्रमासाठी वनविभाग, शेटफळ (इंदापूर) तसेच बारामतीग्रो लिमिटेड शुगर डिव्हिजन यांचे विशेष सहकार्य लाभले. “एक रोप एक संकल्प, पर्यावरण संरक्षण आपला धर्म” या संदेशासह राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपणामुळे परिसरात हरितक्रांतीकडे वाटचाल होण्यास हातभार लागणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!