पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पोलिस पाटील पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
हिंगोली जिल्हा पोलीस पाटील येथे पोलीस पाटील या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला हिंगोली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://hingoli.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पोलीस पाटील.
– नोकरीचे ठिकाण : हिंगोली जिल्हा (उपविभाग बसमत, कळमनुरी, हिंगोली).
– शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी (१० वी) उत्तीर्ण.
– वयोमर्यादा : दि. २६ जानेवारी २०२६ रोजी अर्जदाराचे वय २५ वर्षे ते ४५ वर्षे दरम्यान असावे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज शुल्क : खुल्या वर्गासाठी: रु. 1000/- आणि आरक्षित / आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी : रु. ६800/-.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : १२ जानेवारी २०२६.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जानेवारी २०२६
– लेखी परीक्षेची तारीख : ०८ फेब्रुवारी २०२६.


