Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik Municipal Election: नाशिकमध्ये भाजपची मोठी कारवाई! माजी महापौरांसह 54 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

Nashik Municipal Election: नाशिकमध्ये भाजपची मोठी कारवाई! माजी महापौरांसह 54 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

Nashik Municipal Election: महानगरपालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार संपायला अवघे काही तास उरले असतानाच, नाशिक भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षशिस्त मोडीत काढून अधिकृत उमेदवारांविरोधात दंड थोपटणाऱ्या तब्बल ५४ बंडखोर नेत्यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामध्ये माजी महापौरांसह २० माजी नगरसेवकांचा समावेश असून, ही नाशिकच्या राजकीय इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

बंडखोरांना घरचा रस्ता

महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने संतापलेल्या अनेक दिग्गजांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे केले होते. काही नेत्यांनी अपक्ष तर काहींनी प्रतिस्पर्धी पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या बंडखोरीमुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रदेश नेतृत्वाच्या आदेशानुसार ही कडक कारवाई करण्यात आली आहे.

यादीत ‘या’ बड्या नावांचा समावेश

या हकालपट्टीच्या यादीत नाशिकमधील अनेक प्रस्थापित नावांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यात माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी सभागृह नेते व गटनेते शशिकांत जाधव, सतीश सोनवणे, कमलेश बोडके, दिलीप दातीर आणि अनिल मटाले यांचा समावेश आहे. तसेच माजी नगरसेवक व पदाधिकारी पुनम सोनवणे, मिरा हांडगे, सुनीता पिंगळे, अंबादास पगारे, अलका अहिरे, रुची कुंभारकर, मुकेश शहाणे, पंडीत आवारे यांच्यासह एकूण ५४ जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी मोठा धक्का

आज सायंकाळी ५:३० वाजता प्रचाराची मुदत संपणार आहे. त्यापूर्वीच ही कारवाई करून भाजपने बंडखोरांना पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांना कडक इशारा दिला आहे. पक्षापेक्षा कुणीही मोठे नाही, हा संदेश या कारवाईतून देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. आता या हकालपट्टीचा परिणाम प्रत्यक्ष मतदानावर आणि भाजपच्या जागांच्या गणितावर कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!