Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Election 2026: मनसे नेते अविनाश जाधवांना हायकोर्टाचा दणका! बिनविरोध निवडीविरोधातील याचिका फेटाळली

BMC Election 2026: मनसे नेते अविनाश जाधवांना हायकोर्टाचा दणका! बिनविरोध निवडीविरोधातील याचिका फेटाळली

BMC Election 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार बिनविरोध निवडून येत असताना, या प्रक्रियेला आव्हान देणारे मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. बिनविरोध निवड झालेल्या वॉर्डांमध्येही मतदारांना ‘नोटा’ (NOTA) चा अधिकार असावा, या मागणीसाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. इतकेच नव्हे तर, न्यायालयाची दिशाभूल केल्याबद्दल खंडपीठाने याचिकाकर्त्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – BMC Election 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचा निकाल लांबणीवर! काय आहे यामागचं नेमकं कारण ?

न्यायालयात काय घडले ?

न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांनी ही याचिका आधीच्या प्रलंबित याचिकांसारखीच असल्याचे सुरुवातीला सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे साम्य नसल्याचे समोर आल्यावर न्यायालयाने ‘तुम्ही न्यायालयात चुकीचे विधान का केले?’ असा सवाल विचारला. माहिती देताना केलेली घाई आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याबद्दल खंडपीठाने सुरुवातीला याचिकाकर्त्यांना दंड ठोठावण्याचे संकेत दिले होते.

हेही वाचा –मोठी बातमी…! मुंबईत ठाकरे बंधूंची ताकद वाढली; मराठा मोर्चा संघटनेचा जाहीर पाठिंबा

न्यायालयाचे निरीक्षण

एखाद्या पक्षकारासाठी चुकीची माहिती देताना तुमची नेमकी भीती काय होती? अशा शब्दांत न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना खडे बोल सुनावले. अखेर दंड न आकारता ही याचिका निकाली काढण्यात आली. याचिकेवर हा निकाल येत असतानाच, राज्यातील २९ महापालिकांमध्ये मतदानापूर्वीच सत्तेचे गणीत स्पष्ट होताना दिसत आहे. आतापर्यंत ६६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. अविनाश जाधव यांची ही याचिका फेटाळली गेल्याने आता बिनविरोध झालेल्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, लोकशाहीत मतदारांना नाकारण्याचा अधिकार (नोटा) हिरावला जात असल्याचा मुद्दा मनसेने या याचिकेच्या माध्यमातून लावून धरला होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!