Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Election 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचा निकाल लांबणीवर! काय आहे यामागचं नेमकं कारण ?

BMC Election 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचा निकाल लांबणीवर! काय आहे यामागचं नेमकं कारण ?

BMC Election 2026: राज्यासह मुंबईचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल यंदा काहीसा विलंबाने लागण्याची शक्यता आहे. उद्या, १५ जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, यंदा मतमोजणीसाठी प्रशासनाने अवलंबलेल्या ‘टप्प्याटप्प्याने मोजणी’ या धोरणामुळे निकालाचे चित्र स्पष्ट होण्यास दुपार उलटण्याची चिन्हे आहेत.

काय आहे विलंबाचे मुख्य कारण?

२०१७ च्या निवडणुकीत सर्व २२७ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात आली होती. मात्र, यंदा ही पद्धत बदलण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, यंदा सर्व प्रभागांची मोजणी एकदम न करता ती टप्प्याटप्प्याने केली जाईल.

मतमोजणीचे नियोजन खालीलप्रमाणे असेल:

  • मर्यादित प्रभाग: एका केंद्रावर एका वेळी केवळ दोनच प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे.
  • क्षमतेचा वापर: मुंबईत एकूण २३ मतमोजणी केंद्रे असून, एका वेळी संपूर्ण शहरात जास्तीत जास्त ४६ प्रभागांचे निकाल प्रक्रियेत असतील.
  • टप्प्यांची संख्या: एकूण २२७ प्रभागांचे निकाल हाती येण्यासाठी मतमोजणीचे साधारण पाच टप्पे होतील.
  • अधिकाऱ्यांची जबाबदारी: २३ पैकी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे १० प्रभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अचूकता आणि सुसूत्रता वाढणार

या निर्णयाबाबत बोलताना निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उपलब्ध मनुष्यबळ विखुरण्यापेक्षा ते कमी प्रभागांवर केंद्रित केल्यास मोजणी प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होईल. यामुळे गोंधळ टाळता येईल आणि आक्षेप किंवा हरकतींचे निवारण जागेवरच करणे सोपे जाईल.

हेही वाचा – ZP Election Schedule : 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले; वाचा पूर्ण वेळापत्रक

मतदारांची आणि उमेदवारांची धाकधूक वाढली

या नव्या पद्धतीमुळे निकालाचे कल (Trends) सकाळी लवकर स्पष्ट होणार नाहीत. काही प्रभागांचे निकाल सकाळी १० वाजेपर्यंत समोर येतील, तर उर्वरित टप्प्यांमधील उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होण्यासाठी दुपार किंवा संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागू शकते. मुंबईसह राज्यातील एकूण २९ महापालिकांसाठी उद्या मतदान होत असून, या ‘हायव्होल्टेज’ निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!