Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dry Day: पुणे-पिंपरीत सलग 3 दिवस ‘ड्राय डे’; मतदानासाठी सुट्टी जाहीर, तर प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

Dry Day: पुणे-पिंपरीत सलग 3 दिवस ‘ड्राय डे’; मतदानासाठी सुट्टी जाहीर, तर प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

Dry Day: उद्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात कडक निर्बंध लागू केले असून मतदारांच्या सोयीसाठी विशेष सवलतींची घोषणा केली आहे.

मद्यविक्रीवर कडक बंदी (Dry Day)

निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज (बुधवार) पासून ते १६ जानेवारी (निकाल लागेपर्यंत) सलग तीन दिवस शहरात मद्यविक्री पूर्णपणे बंद राहील. सर्व घाऊक व किरकोळ मद्यविक्री दुकाने, परमिट रूम, बिअर बार आणि देशी दारूची दुकाने या आदेशांतर्गत सील करण्यात येणार आहेत. मद्याच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

हेही वाचा – BMC Election 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचा निकाल लांबणीवर! काय आहे यामागचं नेमकं कारण ?

कामगारांना मतदानासाठी ‘पेड लीव्ह’

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कामगार विभागाने सर्व खासगी आस्थापनांना कडक सूचना दिल्या आहेत. पुण्यातील सर्व दुकाने, कारखाने आणि आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना गुरुवारी भरपगारी सुट्टी देणे अनिवार्य आहे. ज्या ठिकाणी पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नाही, तिथे कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान २ ते ३ तासांची सवलत द्यावी लागेल. जर एखाद्या कंपनीने सुट्टी नाकारली, तर कर्मचारी कामगार आयुक्तालयाकडे ई-मेलद्वारे तक्रार नोंदवू शकतात.

दरम्यान, पुण्यातील वाढते धूलिकण आणि प्रदूषण लक्षात घेता महापालिकेने मतदारांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. मतदान केंद्रांच्या परिसरात धूळ उडू नये, यासाठी रस्ते स्वच्छ करून ‘मिस्ट मशीन’ द्वारे पाण्याची सूक्ष्म फवारणी केली जाणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मतदानासाठी येताना प्रदूषणाचा त्रास होणार नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!