मुंबई : तमिळ सुपरस्टार थलापती विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जाना नयागन’च्या प्रदर्शनाभोवतीचा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. चित्रपट निर्माता केव्हीएन प्रॉडक्शन्सने मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या स्थगिती आदेशाविरुद्ध विशेष परवानगी याचिका दाखल केली आहे, ज्याची सुनावणी गुरुवारी (दि.१५) रोजी होणार आहे.
अभिनेता विजयच्या ‘जाना नयागन’ चित्रपटाच्या प्रदर्शनाभोवतीच्या वादावर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. चित्रपटाची निर्मिती कंपनी केव्हीएन प्रॉडक्शन्सने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने अभिनेता-जननेता विजय यांच्या ‘जन नायगन’ या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्याच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती दिली.
दरम्यान, विजय यांनी अलीकडेच ‘तमिलगा वेत्री कळघम’ हा त्यांचा राजकीय पक्ष स्थापन केला आणि राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ‘जन नायगन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.


