Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dhule : हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत; राजकीय वर्तुळात मोठी उडाली खळबळ, धुळ्यातली घटना

Dhule : हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत; राजकीय वर्तुळात मोठी उडाली खळबळ, धुळ्यातली घटना

Dhule : धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एका संशयित तरुणाला एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी अडवले असता त्या तरुणाने मतदान कार्डचा गठ्ठा आणि यादी सोडून पळ काढला. हा सर्व प्रकार एमआयएम पक्षाच्या माध्यमातून उघडकीस आला.

प्रभाग 4 मध्ये…

धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असतानाच प्रभाग 4 मध्ये एकाच वेळी हजारो मतदान कार्ड सापडल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हा साठा शोधून काढला आणि प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतक्या मोठ्या संख्येने मतदान कार्ड बाहेर कसे आले आणि त्याचा उद्देश काय होता, यावर आता चर्चांना उधाण आले आहे.

निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी हा साठा जमवण्यात आला असावा असा संशय एमआयएमच्या नेत्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी आयुक्तांकडे धाव आणि कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत एमआयएमचे नेते इर्शादजहागीरदार यांनी तातडीने धुळे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी सापडलेल्या मतदान कार्डांची माहिती प्रशासनाला दिली असून, यामागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!